Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

बालझुंबडच्या समुहनृत्य स्पर्धेत झाला नारी सन्मानाचा जागर ; 500 स्पर्धक सहभागी

बालझुंबडमधून सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात नवनेतृत्व निर्माण होते-नगरसेवक महादेव आदमाने

अंबाजोगाई : अंबाजोगाई - अंबाजोगाईची सांस्कृतिक चळवळ गतीमान करण्याचे काम बालझुंबड करीत आहे. बालझुंबडमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांचा विकास होतो. राजकिशोर मोदी यांच्या दुरदृष्टीतून अंबाजोगाईत बालझुंबड हा महत्वपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नगरसेवक महादेव आदमाने यांनी केले.तर बालझुंबड हा महत्वपूर्ण उपक्रम आहे.बालझुंबड स्पर्धेची दखल राज्यस्तरावर घेतली जात असल्याचे प्रतिपादन पत्रकार प्रकाश लखेरा यांनी केले. बालझुंबडच्या समुह नृत्य स्पर्धेच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते.समुह नृत्य स्पर्धेने बालझुंबडचा समारोप शनिवार, दि.11 जानेवारी 2020 रोजी झाला.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने बालझुंबड- 2020 चे आयोजन अंबाजोगाई शहरात दिनांक 5 ते 11 जानेवारी 2020 या कालावधीत करण्यात आले होते.शनिवार दि.11 जानेवारी रोजी येथील आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित समुहनृत्य या स्पर्धेत तालुक्यातून एकूण 500 विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले. सदरील स्पर्धा ही इयत्ता 1 ली ते 4 थी,इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी या तीन गटात घेण्यात आली.समुह नृत्य स्पर्धेचा विषय "नारी सन्मान" हा होता.उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश लखेरा,मुख्याध्यापिका स्वरूपाताई कुलकर्णी,परिक्षक म्हणून मोहम्मद सोहेल शेख (राष्ट्रीय परिक्षक, स्पोर्ट डांन्स कॉम्पीटिशन),अंकिता कपाळे (राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती डांन्स कॉम्पीटीशन) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक महादेव आदमाने हे होते.यावेळी बोलताना मुख्याध्यापिका स्वरूपाताई कुलकर्णी म्हणाल्या की,"नारी सन्मान" हा समुह नृत्य स्पर्धेचा विषय ठेवला हे स्तुत्य व अभिनंदनीय आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा जागर म्हणजे बालझुंबड आहे असे विचार सौ.कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तर अध्यक्षीय समारोप करताना नगरसेवक महादेव आदमाने यांनी सांगितले की, बालझुंबडच्या यशाचे गमक आयोजकांच्या कल्पकतेत दडले आहे.बालकांच्या व्यक्तीमत्वाला आकार देण्याचे काम बालझुंबड करीत आहे.अंबाजोगाई शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ह हे व्यासपीठ आहे.सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात भावी नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता बालझुंबड

मध्ये आहे.स्पर्धेचे संयोजक राजकिशोर मोदी व सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांचे नगरसेवक महादेव आदमाने यांनी बालझुंबडच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनंदन केले.प्रारंभी दिपप्रज्वलन व लोकशिक्षक सानेगुरूजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनंत कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन समन्वयक राजेश कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार मंगेश बलुतकर यांनी मानले. बालझुंबडच्या यशस्वितेसाठी संयोजक तथा प्रियदर्शनी क्रिडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांचे मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकर्ते नगरसेवक सुनिल व्यवहारे,विशाल जगताप, प्रा.अनंत कांबळे,सचिन जाधव तसेच समन्वयक राजेश कांबळे, विनायक मुंजे,चंद्रकांत गायकवाड,आनंद टाकळकर यांनी पुढाकार घेतला होता.

Monday 13th of January 2020 07:45 PM

Advertisement

Advertisement