Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

बदलत्या जीवनशैलीमुळेच वाढतेय आजारांचे प्रमाण-अक्षय मुंदडा

मोफत शिबीरात लिव्हरच्या 50 रूग्णांची तज्ञांकडून तपासणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई- शेतीमध्ये किटकनाशके, रसायने यांचा अतिवापर झाल्याने जमिनीचा पोत बिघडला आहे.हे विषारी घटक उत्पादीत अन्न-धान्यातून माणसांच्या शरिरीरात प्रवेश करीत असल्याने तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे,ताणतणाव यांचा परिणाम आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे प्रतिपादन युवानेते अक्षय मुंदडा यांनी केले.तर यावेळी बोलताना सुप्रसिद्ध आयुर्वेदीक तज्ञ डॉ.उदय खरे यांनी बोलताना सांगितले की, लोकसंख्येचा विचार करून रूग्णांवर उपचार केले जातात. अशा वेळी रूग्ण निहाय उपचार व प्रकृती निरपेक्ष औषधे दिल्यास रूग्णाला तात्काळ फायदा होतो व रूग्ण बरा होतो. मपचनसंस्था हे सर्व आजाराचे मुळ आहे.शारिरीक व्याधींमुळे मानसिक व्याधी निर्माण होतात. लिव्हरमुळे आजारांचे प्रमाणे वाढत आहे.अशा काळात आजाराचे मुळ शोधल्यास उपचार करणे शक्य होते असे सांगुन लिव्हर संबंधित रूग्णांनी पुण्याला येवून खर्चीक उपचार न घेता मराठवाड्यात प्रथमच अंबाजोगाई येथे क्षारपाणि आयुर्वेद लिव्हर केअर सेंटरच्या व डॉ.डी.बी.चामनर यांच्या माध्यमातून अंबाजोगाईत अल्पदरात उपचार सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगुन डॉ.चामनर यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे डॉ.उदय खरे (पुणे) यांनी यावेळी सांगितले.

अंबाजोगाईत रविवार,दि.12 जानेवारी रोजी क्षारपाणि आयुर्वेद लिव्हर केअर सेंटरचे उद्घाटन व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते.मराठवाड्यात हे पहीलेच केंद्र आहे.त्यामुळे यापुढे मराठवाड्यातील लिव्हर संबंधित आजाराच्या रूग्णांना याचा फायदा होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध आयुर्वेदीक तज्ञ डॉ. उदय खरे (पुणे) तर शिबीराचे उद्घाटक म्हणून उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते अक्षय मुंदडा,प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नंदकिशोर देशपांडे,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,डॉ. गोपाळ चौसाळकर,डॉ.दत्तात्रय दगडगावे, डॉ.सतिष गित्ते,क्षारपाणि आयुर्वेद लिव्हर केअर सेंटरचे प्रमुख डॉ.डी.बी.चामनर आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उद्घाटनानंतर मान्यवरांचा स्वागत सोहळा झाला.याप्रसंगी प्रास्ताविक करताना डॉ.देवराज चामनर यांनी मानसिक ताण-तणावांमुळे लिव्हर संबंधीत आजारांची प्रमाण वाढत असल्याचे सांगुन रूग्णांच्या आजारांचे योग्य निदान झाले.पाहिजे आयुर्वेदा मध्ये प्रचंड ताकद आहे.आयुर्वेदाच्या माध्यमातून गेली वीस वर्षे आपण मुळव्याधग्रस्त रूग्णांवर उपचार करीत आहोत. हजारो रूग्णांची तपासणी आणि उपचार करून त्यांना व्याधीमुक्त करण्याचे काम केले आहे.अशी माहिती देवून डॉ.उदय खरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे लिव्हर संबंधीत आजारांवर उपचार केले जातील अशी माहिती डॉ.चामनर यांनी यावेळी दिली.याप्रसंगी नगरसेवक संजय गंभीरे,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,डॉ.गोपाळ चौसाळकर, डॉ.नंदकिशोर देशपांडे, उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार डॉ.सतिष गित्ते यांनी मानले. यावेळी डॉ.श्रीराम काळे,डॉ.राहूल धाकडे, डॉ.शेख मुक्तार,डॉ.शशांक पाठक,डॉ.संदीप जैन,डॉ.अमोल चाटे,डॉ.राम धायगुडे,डॉ. आकुसकर,अ‍ॅड.काळम पाटील,वैजेनाथ सोमवंशी,विद्याधर पांडे,भागवत काचगुंडे, व्यंकटेश चामनर,आयुर्ग्राम फौंडेशनचे अध्यक्ष बापुराव चामनर, उपाध्यक्षा सौ.देवकी चामनर, कोषाध्यक्ष चंद्रकांत वडमारे, सहसचिव संतोष गवळी यांच्या सहीत वर्ग मिञ परिवार व अनेकांची उपस्थिती होती.

Monday 13th of January 2020 07:45 PM

Advertisement

Advertisement