Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

’मानवलोक’च्या वतीने अंबाजोगाई तरुण महोत्सवाचे आयोजन

ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना मिळणार क्रीडा नैपुण्य दाखविण्याची संधी

अंबाजोगाई : अंबाजोगाई - ग्रामीण भागात विविध क्रीडा प्रकारात तरुण खेळाडू तयार व्हावेत, स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी त्यांना प्राप्त व्हावी यासाठी ‘मानवलोक’च्या वतीने ‘अंबाजोगाई तरुण महोत्सव-२०२०’ चे आयोजन करण्यात आले आहे. १ फेब्रूवारी ते ५ फेब्रूवारी २०२० या कालावधीत हा तरुण महोत्सव संपन्न होणार आहे.

निमशहरी आणि ग्रामीण भागात अनेक क्रीडा प्रकारात पारंगत आणि शारीरिक क्षमता असणारे तरुण खेळाडू असतात. परंतु योग्य संधी, मार्गदर्शनाच्या अभावी ते क्रीडा क्षेत्रात भविष्य घडवू शकत नाहीत. अशा तरुणांमधे खेळाच्या माध्यमातून उत्साह निर्माण व्हावा, ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना एक मंच मिळावा आणि त्यांच्यातील क्षमतांना सिद्ध करण्याची संधी मिळावी व खेळाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा व सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता मानवलोक परिवारामार्फत १ फेब्रूवारी ते ५ फेब्रूवारी या कालावधीत ‘अंबाजोगाई तरुण महोत्सव-२०२०’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात तरुण-तरुणींसाठी कुस्ती, कबड्डी, व्हॉलीबॉल या खेळांच्या स्पर्धा, इन्नोफेस्ट (विज्ञान/संकल्पना प्रदर्शन) आणि एका तरुण नेतृत्वासोबत मुला-मूलींचा प्रश्न-उत्तरातुन थेट ‘तरुण संवाद’ असे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत. तसेच विजेत्या स्पर्धकांना एक लाखांपेक्षाही अधिक रकमेच्या भरघोस बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे. या महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश नि:शुल्क असून सहभागी होण्यासाठी २० जानेवारी पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. मानवलोकच्या अंबाजोगाई येथील मुख्य कार्यालयाच्या भव्य प्रांगणात हा महोत्सव संपन्न होणार आहे.

बीड जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी सर्व क्रीडा स्पर्धात, इन्नोफेस्ट आणि ‘तरुण संवाद’ कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मानवलोक परिवाराच्या वतीने कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी केले आहे.

Monday 13th of January 2020 07:30 PM

Advertisement

Advertisement