Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

स्थापना दिनानिमित्त इनरव्हीलच्या वतीने 100 ब्लँकेटचे वाटप

अंबाजोगाई : अंबाजोगाई - येथील इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्या वतीने स्थापना दिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.समाजातील निराधार वृद्ध,महिला,पुरूष व बालकांना थंडी पासुन बचाव करणार्‍या 100 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम शहरातील मंगळवार पेठ मधील बालकमंदीर,जनसहायोग कार्यायालत आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अरूंधती पाटील, उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे,कल्पनाताई लोहिया तसेच व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी,सचिव अंजली चरखा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा.अरूंधती पाटील यांनी समाजात वंचित लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना तात्काळ मिळाल्या पाहिजेत असे सांगुन मानसाने माणसांचे मन जाणले पाहिजे व मदतीसाठी माणूसकीच्या नात्याने पुढे आले पाहिजे असे विचार मांडले.उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे यांनी इनरव्हीलच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.यावेळी कल्पनाताई लोहिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी वाढदिवसानिमित्त

इनरव्हील सदस्य सौ.वनमाला बुरांडे यांचे मान्यवरांनी अभिष्टचिंतन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सुहासिनी मोदी तर सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार सचिव अंजली चरखा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इनरव्हील सदस्य वनमालाताई बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शामराव सरवदे,संजना आपेट, सावित्री सगरे आणि इनरव्हीलच्या सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Monday 13th of January 2020 04:45 PM

Advertisement

Advertisement