Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

अंबाजोगाईत महीलांनी काढली मोटारसायकल रॅली

अंबाजोगाई : अंबाजोगाई  -अंबाजोगाई   उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दिनांक 11 जानेवारी ते 17 जानेवारी या सप्ताहात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर सप्ताह दरम्यान  रस्ता वाहतूक नियम विषयक प्रबोधन व जनजागृती असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. दि.11 जानेवारी रोजी अंबाजोगाई शहरातून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान महिलांची बाईक रॅली काढण्यात आली.    

सदरील रॅलीमध्ये वेणूताई कन्या  महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय आणि इनरव्हील रोटरी क्लबच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक गाढवे , पारशेटे, गाढवे, फड ,तांगडे, कांबळे इत्यादी  वाहतूक शाखा पोलीस यांनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला .नागरिक व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले.

Saturday 11th of January 2020 08:15 PM

Advertisement

Advertisement