Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

बालझुंबडच्या वैयक्तीक नृत्य स्पर्धेत बहारदार सादरीकरण; 400 स्पर्धक सहभागी

बालझुंबडमुळे अंबाजोगाईची सांस्कृतिक चळवळ गतीमान - नगरसेवक मनोज लखेरा

अंबाजोगाई : अंबाजोगाई - बालझुंबडमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांचा विकास होतो. अंबाजोगाईची सांस्कृतिक चळवळ गतीमान करण्याचे काम बालझुंबड करीत आहे. राजकिशोर मोदी यांच्या दुरदृष्टीतून अंबाजोगाईत बालझुंबड हे सशक्त व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन नगरसेवक मनोज लखेरा यांनी केले. तर मंचावर आपली कला सादर करण्यासाठी धाडस लागते बालझुंबडच्या मंच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण होते अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन पत्रकार नागेश औताडे यांनी केले.

बालझुंबडच्या वैयक्तीक नृत्य या स्पर्धेच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने बालझुंबड-2020 चे आयोजन अंबाजोगाई शहरात दिनांक 5 ते 11 जानेवारी 2020 या कालावधीत करण्यात आले आहे.दि.10 जानेवारी शुक्रवार रोजी येथील विलासराव देशमुख सभागृह येथे आयोजित वैयक्तीक नृत्य या स्पर्धेत तालुक्यातून एकूण 400 विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले.सदरील स्पर्धा ही इयत्ता 1 ली ते 4 थी, इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी या तीन गटात घेण्यात आली.उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मनोज लखेरा, पत्रकार नागेश औताडे, मोहंमद सोहेल शेख (राष्ट्रीय परिक्षक स्पोर्ट डांन्स कॉम्पीटिशन), अंकिता कपाळे (राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती डांन्स कॉम्पीटीशन) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एच.कांबळे (मुख्याध्यापक,सृजन प्राथमिक विद्यालय) अध्यक्षीय समारोप करताना बी.एच.कांबळे (मुख्याध्यापक,सृजन प्राथमिक विद्यालय) यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या यश संपादनासाठी बालझुंबड हे व्यासपीठ उपयुक्त आहे. या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त करणे हे महत्वाचे नसून कला सादर करणे हे गरजेचे आहे. स्पर्धेचे संयोजक राजकिशोर मोदी व सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांचे मुख्याध्यापक कांबळे यांनी बालझुंबडच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनंदन केले.

प्रारंभी दिपप्रज्वलन व लोकशिक्षक सानेगुरूजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक राजेश कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार मंगेश बलुतकर यांनी मानले. वैयक्तीक नृत्य स्पर्धा आयोजना करिता बालझुंबड संयोजन समितीचे समन्वयक राजेश कांबळे, आप्पा चव्हाण, होके सर, मुख्याध्यापक सि.व्ही.गायकवाड यांचेही सहकार्य लाभले.बालझुंबडचा समारोप आज 11 जानेवारी 2020 रोजी होईल आज समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालझुंबडच्या यशस्वितेसाठी संयोजक तथा प्रियदर्शनी क्रिडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांचे मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकर्ते नगरसेवक सुनिल व्यवहारे,विशाल जगताप, प्रा.अनंत कांबळे,सचिन जाधव तसेच समन्वयक राजेश कांबळे, विनायक मुंजे,चंद्रकांत गायकवाड,आनंद टाकळकर हे पुढाकार घेत आहेत.

Friday 10th of January 2020 04:30 PM

Advertisement

Advertisement