Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचे माझ्यासमोर आव्हान - ना. धनंजय मुंडे

सामाजिक न्याय विभागाच्या योजना समजून सांगणाऱ्या चित्ररथाचे बीडमध्ये उदघाटन

बीड : बीड : बीड जिल्ह्यातील माय - बाप जनतेने भरभरून केलेलं प्रेम हे कधीही उतराई होणे शक्य नाही, येणाऱ्या पाच वर्षात राज्याचा मंत्री म्हणून व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना निवडणुकीपूर्वी दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचे आपल्यासमोर आव्हान असणार आहे व त्यादृष्टीने आपण सर्वस्वी काम करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले; ते बीड येथे पत्रकार आयोजित परिषदेत बोलत होते.

श्रीक्षेत्र नारायणगड, भगवानगड, गहिनीनाथगड हे जिल्ह्याचे नव्हे तर सबंध महाराष्ट्राचे शक्तीपीठ आहेत, येथून राजकारण कधीही होणार नाही, असे म्हणतच ना. मुंडे जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाजपचे दिवंगत नेते स्व. गोपिनाथराव मुंडे यांच्या विचारांचा व संघर्षाचा वारसा पुढेही चालवत ठेवायला आपल्याला नक्कीच आवडेल असेही ना. मुंडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. परळी विधानसभा मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले, हा विजय व हे मंत्रिपद त्यांच्याच सेवेत समर्पित असून आज जिल्ह्यात व परळीत होत असलेल्या भव्य स्वागतांनी आपण भारावून गेलो होत अशा शब्दात ना. मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उदघाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून हा चित्ररथ राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात फिरणार असून, या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती तळागाळातील जनतेला देण्यात येणार आहे. एका दिवशी 5 गावात हा चित्ररथ जाणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, विविध शिष्यवृत्ती योजना यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती एलएडी व ध्वनी क्षेपण यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ना. धनंजय मुंडे पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा दौऱ्यावर प्रथमच आले असता आज (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व विकासकामांचा व समस्यांची माहिती घेत आहेत. या आढाव्यानन्तर आपण पुढील ऍक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही ना. मुंडे म्हणाले.

Friday 10th of January 2020 03:30 PM

Advertisement

Advertisement