जागतिक एड्स दिना निमित्त प्रभातफेरी संपन्न
बीड : बीड, दि.30 (जि.मा.का) - 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणुन सर्वत्र पाळला जातो. या वर्षीचे घोषवाक्य “समाज बदल घडवू शकतोê” हे आहे. हे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी वैयक्तीक, सामाजिक व शासकीय पातळीवर जबाबदारी घेऊन जागरुकता निर्माण करण्याकरिता प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय, बीड मार्फत जागतिक एड्स दिन निमित्त प्रभातफेरी आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय,यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुल या ठिकाणी करण्यात आले.
यावेळी रॅलीत उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, शिक्षणधिकारी श्री.तुकाराम जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.कमलाकर आंधळे, डॉ.देशपांडे, डॉ.जयश्री बांगर, डॉ.निपटे, डॉ.संजय कदम, डॉ.एन.बी.पटेल, डॉ.अरुण राऊत, श्री.तत्वशील कांबळे, श्री.अशोक तांगडे, श्री.देशपांडे, जिल्हा न्यायलाय यांची प्रभातफेरीस प्रमुख उपस्थिती होती. ही प्रभात फेरी जिल्हा क्रिडा संकुल- सुभाष रोड - भाजीमंडई - बशीरगंज - या मार्गाने फिरुन मल्टीपर्पज ग्राऊंड शिवाजी पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रभातफेरीमध्ये स्त्री शक्ती करे पुकार - एचआयव्ही/एड्स हद्दपार, जगा आणि जगू दया, वचन पाळा एड्स टाळा व इतर घोषवाक्यांनी शहरात जनजागृतीपर घोषणा दिल्या. समारोप प्रसंगी शासकिय नर्सिंग कॉलेज बीड, के.एस.के महाविदयालय बीड यांच्या युवा टिमने एचआयव्ही/एड्स बाबत पथनाटय तर अंगणवाडी सेविका श्रीमती रंजना थोरात यांनी एकपात्री नाटकच्या माध्यतातून एचआयव्ही/एड्स बाबत सादरीकरण करुन उपस्थित विदर्यार्थ्यांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी इंन्फट इंडियाचे प्रकल्प संचालक दत्ता बारगजे यांनी समाज बदल घडवु शकतो या विषयावर उपस्थित विदर्याथी विदर्याथीनीना मार्गदर्शन केले.
उपसंचालक डॉ.माले सर यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन एचआयव्ही चाचणी करुन घेण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले तसेच समाजातील लोकाना नवीन एचआयव्हीची बाधा होऊ नये, तसेच एचआयव्ही बाधित लोकांचा मृत्यूदर शून्यावर आणावा तसेच एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या बाबतीत कलंक व भेदभावाची भावना कमी व्हावी, या उद्देशाने कार्य जनजागृती कार्य करण्याचे आवाहन केले. रॅलीत सहभागी शाळा, महाविद्यालय, NCC संघ, इंफन्ट इंडिया, पोलीस बँड पथक, विविध अशासकिय संस्थेचे पदाधिकारी यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक श्री.सुहास कुलकर्णी व समुपदेशक श्री. जनार्धन माचपल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती.साधना गंगावणे यांनी केले, कार्यक्रमासाठी विविध अशासकिय संस्थेचे पदाधिकरी,समाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. या रॅलीच्या यशस्वीततेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे, सुहास कुलकर्णी, एफ.आर. फारोखी, नवनाथ चव्हाण, एफ.आर.इनामदार, जनार्धन माचपल्ले, महादेव इंगळे, अमोल घोडके, नागेश गुंजे, प्रेमराज गायकवाड संतोष डोलारे, सुनिल गायकवाड, सुमित्रागलधर, संतोष नाईकनवरे, विशाखा सुर्यवंशी, शिंदे मॅडम, घुगे मॅडम, मंगल मोहळकर, सुनील काळुंखे, बापु लुंगेकर, शेख सलीम, रेखाताई इ. विशेष परीश्रम घेतले.
