Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

डॉ.प्रियंका रेड्डी प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी-राजकिशोर मोदी

महाराष्ट्राच्या राज्यपालांना काँग्रेस आरोग्य सेवा सेलचे निवेदन

अंबाजोगाई : अंबाजोगाई (प्रतिनिधी) तेलंगाणा राज्यातील शमशाबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या युवतीचा अमानविय अत्याचार करुन निर्घुण खुन करण्यात आला.या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे.त्यामुळे या प्रकरणातील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या वतीने शनिवार,दि.30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बीड जिल्हा काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या वतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तेलंगाणा राज्यातील शमशाबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीचा अमानविय अत्याचार करुन निर्घुण खुन करण्यात आला.या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे.डॉ.प्रियंका रेड्डीची हत्या ही केवळ तिची हत्या नसून ती मानवतेची हत्या झाली आहे. मानवतेला काळीमा फासला गेला आहे.अशा प्रकारच्या घटना आपल्या देशात वारंवार घडत असल्याने देशातील माता- भगिनींना असुरक्षित वाटत आहे.अशा प्रकरणातील गुन्हेगारांना जो पर्यंत कडक शासन होणार नाही.तो पर्यंत अशा घटना घडतच राहतील. गुन्हेगारांनी गुन्हा करण्यापुर्वी अनेकदा विचार करावा अशी कडक शिक्षा होणे गरजेचे आहे.

तरी महामहिम राज्यपाल यांनी निवेदनाद्वारे आम्ही मागणी करणाऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन मयत डॉ.प्रियंका रेड्डी यांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी ही भावना आमचीच नव्हे तर पुर्ण देशाची आहे. सदरील निवेदनाची दखल घ्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रतिलीपी माहितीस्तव-1)मा.मुख्यमंत्री, मंत्रालय,हैद्राबाद,तेलंगाणा राज्य,2)राज्यपाल,हैद्राबाद, तेलंगाणा राज्य 3)मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मुंबई.,4) जिल्हाधिकारी साहेब,बीड.यांना देण्यात आल्या आहेत.सदरील निवेदन देताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,शेख मुख्तार(बीड जिल्हाध्यक्ष आरोग्य सेवा सेल), नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनिल व्यवहारे, माणिक वडवणकर,राणा चव्हाण,अब्दुल हाफीज सिद्दिकी,शेख जावेद,विशाल पोटभरे,सचिन जाधव,शेख अकबर,सुशील जोशी,माऊली वैद्य,सुमीत सुरवसे,अकबर पठाण,मुबीन पठाण यांचे सहीत इतरांची उपस्थिती होती.

Saturday 30th of November 2019 05:30 PM

Advertisement

Advertisement