Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

अवकाळी पावसाचे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ७० कोटींचे वाटप

बीड : बीड - अतिरिक्त पावसामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ९० टक्के शेतीतील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदानाची घोषणा करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जवळपास ६९ कोटी ९२ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम येत्या काही दिवसात संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिरिक्त पावसाने मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. बीड जिल्ह्यात ९० हजार ८७३ शेतकर्‍यांच्या खात्यावर ६९ कोटी ९२ लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. ४८.५० टक्के शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचे अनुदान मिळाले असून उर्वरित शेतकर्‍यांना अदुना वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. एकूणच संपूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकर्‍यांना अनुदान वाटप करण्यात येत आहे. दरम्यान नुकसानपोटीचा पहिला हप्ता शासनाने १८ नोव्हेंबर रोजी जाहीर केल्यानंतर अवघ्या आठवडाभरात मराठवाड्याला मिळालेल्या ८१९ कोटीपैकी तब्बल ६०८ कोटी ७२ लाख रुपयांची मदत विभागातील साडेसात लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

Friday 29th of November 2019 04:45 PM

Advertisement

Advertisement