Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

अंबाजोगाईत 1 डिसेंबर रोजी व्याख्यान व पुरस्कार वितरण

अंबाजोगाई : अंबाजोगाई - 'परिवर्तन संशोधन'च्या वतीने रविवार,दि.1 डिसेंबर 2019 रोजी सायं.5.30 वा.व्याख्यान आयोजित केले असून यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.

अंबाजोगाईत हा कार्यक्रम विलासराव देशमुख सभागृह, न.प.येथे होत असून या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून अॅड.आण्णाराव पाटील (अध्यक्ष,महाराष्ट्र विकास आघाडी) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी),प्रमुख वक्ते म्हणून प्रा.यशपाल भिंगे (नांदेड) यांच्या सहीत संभाजीराव सुळ (संचालक,लातुर जिल्हा म.सह.बँक),अशोक आम्ले (पोलिस उपअधीक्षक,केज),डॉ.महादेव बनसुडे (उपअधिक्षक,शा.रू.व.महा.लातूर),लालासाहेब लोमटे (मुंबई),संदीपान नरवटे (अध्यक्ष, यशवंत ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य.),अ‍ॅड.अनंतराव जगतकर (आनंद गॅस सर्व्हिस,अंबाजोगाई),डॉ.हनुमंत किनीकर (सह्याद्री हॉस्पिटल,लातूर.),डॉ.प्रल्हाद गुरव (योगेश्वरी मॅटर्निटी होम.अंबाजोगाई.), काकासाहेब मोरे (सामाजिक कार्यकर्ता, अंबाजोगाई),हनुमंत सरवदे या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.यावेळी पुरस्कार गौरवमुर्ती म्हणून प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे(आदर्श आध्यापक),संदीप गिरी (आदर्श शिक्षक),दत्ताभाऊ वाकसे (युवा गौरव),भाऊराव गवळी (उद्योगरत्न),महादेव माने (संगितरत्न),कु.वैष्णवी वैजनाथ शिंदे (कलारत्न) यांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.तरी द्वितीय वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभास अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन 'परिवर्तन संशोधन'चे चंद्रकांत हजारे (संपादक),प्रा.गौतम गायकवाड (कार्यकारी संपादक) यांनी केले आहे.

Friday 29th of November 2019 04:45 PM

Advertisement

Advertisement