''बार्टी'' तर्फे चनई येथे संविधान दिन उत्साहात साजरा
▪ 'संविधान साक्षर ग्राम' अभियानाचे चनई येथे उत्साहात उदघाटन.
अंबाजोगाई : अंबाजोगाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्थेच्या वतीने संविधान साक्षर ग्राम चनई येथे संविधान दिन उत्साहात साजरा करून 'संविधान साक्षर ग्राम' अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
महासंचालक श्री.कैलास कणसे साहेब, समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे मॅडम व बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री.सर्वेश्वर कोठुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुक्यातील मौजे चनई येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चनई हे गाव बार्टी तर्फे संविधान साक्षर ग्राम म्हणून निवडण्यात आले आहे. महिनाभर या गावात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. बार्टी तर्फे राज्यातील 72 गावात 'संविधान साक्षर ग्राम' अभियान राबविले जाणार आहे. आज त्यानिमित्त चनई येथे संविधान दिन साजरा करून अभियानास सुरुवात करण्यात आले.
कार्यकर्माची सुरूवात संविधान रॅली काढून करण्यात आली. सांडेश्वर विद्यालयातून या रॅलीस सुरुवात झाली. रॅलीत पालखीचे आयोजन करून पालखीत संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व भारतीय संविधान हे ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायत परिसरात सर्व जण एकत्र येऊन सर्वांनी अभिवादन केले व सामूहिकरित्या संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच श्रीमती फुलबाई गोचडे, उपसरपंच अनिल शिंदे, ग्रामसेवक जांभळे साहेब, जि.प.प्रा.शाळेचे सर्व विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री.नवगिरे सर सर्व सहकारी, सांडेश्वर माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण सर व सर्व सहकारी गावातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बार्टी चे समतादूत जोशी व्यंकटेश , दीपक दहिफळे, वर्षा देशमुख इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बार्टी चे समतादूत जोशी व्यंकटेश, दीपक दहिफळे, वर्षा देशमुख यांनी परिश्रम घेतले.
