Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

''बार्टी'' तर्फे 'संविधान साक्षर ग्राम' चनई येथे स्वच्छता अभियान

अंबाजोगाई : अंबाजोगाई : डॉ.बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्थे मार्फत संविधान साक्षर ग्राम हे अभियान घेण्यात येत आहे. आज या अभियाना अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातीलचनई या 'संविधान साक्षर' ग्राम मध्ये स्वच्छता अभियान घेण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.प्रा.शाळा, अंगणवाडी, मंदिर परिसर, दलित वस्ती इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात आले. या अभियानात शाळेतील विद्यार्थी, गावातील महिला, पुरुष, युवक व सहभागी झाले होते. स्वच्छतेचे महत्व सर्वांना समजावे यासाठी गावात रॅली काढण्यात आली. स्वच्छता पूर्ण झाल्यावर उत्कृष्ट करण्याऱ्या स्वयंसेवकास पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 70 व्या संविधान दिनाचे औचित्य साधून बार्टी तर्फे संविधान साक्षर ग्राम हे अभियान राबविले जात आहे.

महासंचालक कैलास कणसे , समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी सर्वेश्वर कोठूळे यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील समतादूत जोशी व्यंकटेश, दीपक दहिफळे, वर्षा देशमुख यांनी परिश्रम घेतले.

Friday 29th of November 2019 03:00 PM

Advertisement

Advertisement