Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

स्व. मंडोदरी कांबळे पुरस्काराने त्यांना केले सन्मानित

अंबाजोगाई : अंबाजोगाई :- तालुक्यातील मुरंबी येथील शालेय शिक्षणासाठी अंबाजोगाई आलेल्या रघुनाथ जगताप नववीत नापास झाल्यामुळे वडील रागवतील या भितीने शहरातच एका ट्रकवर क्लिनरकी करत उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेतली त्याच्या या उतुंग यशाची दखल सामाजिक कार्यकर्त्या स्व. मंडोदरी ज्ञानोबा कांबळे प्रतिष्ठानने घेवुन उत्कृष्ठ उद्योजक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सलेल्या गावात 1000 लोकसंख्या आहे. वडिलोपार्जित कोरडवाहू चार एकर जमीन असून या जमिनीत दोघा भावंडाचा उदरनिर्वाह कसा भागेल या हेतुने रघुनाथ जगताप यांना यांच्या वडिलांनी अंबाजोगाई येथील खोलेश्र्वर शाळेत प्रवेश मिळवून दिला. परंतु शालेय जिवनात रघुनाथ जगताप यांना नववी मध्ये अनुतीर्ण झाले आपण नववी मध्ये नापास झाल्यामुळे गावी गेल्यावर वडील रागवतील या भितीने त्यांनी काळे यांच्या ट्रकवर क्लिनकी करत गाडी शिकून त्याच ट्रकवर सात वर्षे चालक म्हणून काम केले. चालकाचे काम करत त्यांनी गावाकडील ग्रामपंचायत मध्ये लक्ष घालून गेल्या वीस वर्षापासून मुरंबीची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे. ग्रामपंचायतचे राजकारण करत अंबाजोगाईत संध्या मल्टीस्टेट, संध्या ऍटोमोबाईल्स, संध्या एजन्सीज, संध्या फॅब्रीकेशन, संध्या मेडीकल फांऊडेशन, संध्या पॅरामेडीकल कॉलेस, बी.एस.सी. नर्सिंग कॉलेच्या माध्यमातून अंबाजोगाई त्यांचे कार्य सुरु असून शुन्यातून विश्र्व निर्माण करणाऱ्या रघुनाथ जगताप यांना स्व. मंडोदरी ज्ञानोबा कांबळे यांच्या स्मरणार्थ उद्योजक कै.बालाप्रसाद बजाज यांच्या नावाचा पुरस्कार देवून त्यांना नुकतेच गौरविण्यात आले आहे. उद्योगा बरोबरच राजकारणातही त्यांची जमेची बाजू आहे. शालेय विद्यार्थ्यांना गेल्या 5 वर्षापासून शैक्षणिक साहित्य वाटप करणे, रुग्णांना वैद्यकिय सुविधा पुरवणे आदी ते उपक्रम नित्याने राबवतात. त्यांच्या या कार्याची कांबळे प्रतिष्ठाणने दखल घेतल्याने रघुनाथ जगताप यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उद्योगात भरारी घेतल्यानेच पुरस्कारासाठी निवड....... उच्च शिक्षण घेतलेच तरुण उद्योजक बनतात ही ओळख पुसण्याचे काम रघुनाथ जगताप यांनी केले असून नववी नापास असतानाही शहरात विविध उद्योगाच्या माध्यमातून आपली प्रगती करत अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. अशा व्यक्तिचा स्व.मंडोदरी ज्ञानोबा कांबळे प्रतिष्ठानने सन्मान करण्याची निश्चित केले हा संन्मान तरुणांसाठी प्रेरणा ठरेल. - ज्ञानोबा कांबळे, अध्यक्ष स्व.मंडोदरी प्रतिष्ठाण

Thursday 28th of November 2019 05:30 PM

Advertisement

Advertisement